आमदार विनायक मेटे आक्रमक! अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याची केली मागणी

मराठ्या साठी आजचा काळा दिवस-मेटे

मराठा समाजासाठी आजचा काळा दिवस आहे. महाविकास आघाडी च्या अपयशामुळे मराठा आरक्षण रद्द झाले. अशोक चव्हाण यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी विनायकराव मेटे यांनी केली आहे. आमदार विनायक मेटे म्हणले की, मराठा आरक्षणाच्या सुनावणीसाठी राज्य सरकारकडून व्यवस्थित पाठपुरावा झाला नाही तर वकील देखील हजर करता आला नाही असा देखील आरोप विनायक मेटे यांनी केला आहे .

या सर्व कारणांमुळे मराठा आरक्षण कोर्टामध्ये टिकू शकला नाही याला सर्वस्वी जबाबदार महा विकास आघाडीचे सरकार आहे असा टोला त्यांनी लगावला तसेच यापुढे आघाडीच्या सरकारला दाखवून देण्यासाठी नियम पाळून आंदोलन करा असे आवाहन देखील मेटे यांनी केले.

error: Content is protected !!