विनायक मेटेंचा आरोप! प्रशासनाकडून टेस्ट करण्यास टाळाटाळ केली जातेय टाळाटाळ

बीड जिल्ह्यातील पॉझिटिव्हिटी रेट चिंताजनक.- मेटे

बीड जिल्ह्यामधील वाढती कोरोना रुग्ण संख्या कमी करण्यासाठी शहरातील व ग्रामीण भागातील नागरिकांच्या अँटीजन व आर टी पी सीआर टेस्ट करा अशी मागणी आमदार विनायक मेटे यांनी केली आहे. बीड जिल्ह्यात पॉझिटिव्हिटी रेट 50% च्या जवळ गेला असून हा भीतीदायक आहे. तो कमी करण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे, असे देखील मेटे म्हणाले.

बीड शहरात लोकसहभागातून 200 बेडचे जिजाऊ माता कोव्हिड केअर सेंटरची पाहणी करताना ते बोलत होते. अँटीजन टेस्ट संदर्भात जिल्हाधिकारी यांना भेटून पत्र दिले आहे. मात्र प्रशासनाकडून टेस्ट करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप देखील यावेळी आमदार विनायक मेटे यांनी केलाय. जर प्रशासन अँटीजन टेस्ट करायला तयार नसेल तर आम्हाला टेस्ट किट पुरवा व टेस्ट करण्यास परवानगी द्या. अशी मागणी मेटे यांनी केली आहे.

ग्रामीण भागासह खेड्यापाड्यात मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित रुग्ण आढळून येत असल्या कारणाने ही साखळी तोडण्यासाठी अँटिजेन टेस्ट व सर्व नागरिकांच्या टेस्ट करणे महत्वाचे आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या मदतीला सामाजिक संस्था यांना सोबत घेऊन आम्ही कोरोनाच्या टेस्ट करू असे देखील विनायक मेटे म्हणाले ते बीडमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

error: Content is protected !!