नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण केला
कोरोना विषाणूचा वाढता कहर दिवसेंदिवस चिंताजनक होत चालला आहे. आशा या भयाण परिस्थितीमध्यें कृष्णा शंकर राठोड वय २९, नवनाथ जय राम राठोड वय ४५ आणि रामराव भीमा चव्हाण वय ३५ हे तिघे बाधित असल्याने वडवणी येथील कोविड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. या तिघांनी सेंटरवरील कार्यरत कर्मचाऱ्यांना काहीही न सांगता विना परवानगी बाहेर पडले. सेंटरवर परतले असता कर्मचाऱ्यांनी विचारपूस केल्यानंतर फळे खरेदी करण्यासाठी गेल्याचे स्पष्ट झाले.
बाधित व्यक्तींना कोरोना संसर्ग व शासन आदेशाबाबत वारंवार सूचना देऊन व ज्ञात असूनही नियमांचे उल्लंघन केले. व समाजातील इतर नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण केला. याप्रकरणी समुदाय आरोग्य अधिकारी दिपक गावडे यांच्या फिर्यादीवरून वडवणी पोलीस ठाण्यात तिघांविरोधात आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५, साथरोग अधिनियम १८९७ सह अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक महेश टाक यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ. आसेफ शेख हे करत आहेत.