बीडमध्ये सर्वाधिक पॉझिटिव्ह तर 1011 रुग्ण कोरोनामुक्त
बीड : जिल्ह्यात रोज कोरोना रुग्णाचीं संख्या वाढत आहे. काला (दि. 3 रोजी आरोग्य विभागाने जिल्ह्यातून 4842 संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी घेतले होते. त्याचा अहवाल आज (दि. 04 मे) रोजी प्राप्त झाला असून त्यामध्ये 1499 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह तर 3343 निगेटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह मध्ये अंबाजोगाई 212,आष्टी 58,बीड 381,धारूर 68,गेवराई 119,केज 151,माजलगाव 68,परळी 126,पाटोदा 59,शिरूर 206 तर वडवणीत 51 रूग्ण आढळून आले आहेत.