बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी केलं स्पष्ट
यंदाच्या वर्षीची Ipl क्रिकेट स्पर्धा रद्द करण्यात आल्याचं बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी स्पष्ट केलं. एएनआय या वृत्तसंस्थेला त्यांनी यासंदर्भातील माहिती दिली. देशात कोरोनाचा वाढता धोका आणि सध्या आयपीएलमध्येही काही रुग्णांना या विषाणूची लागण झाल्यामुळं हा निर्णय़ घेण्यात आल्याचं कळत आहे. बीसीसीआयनं दिलेल्या माहितीनुसार स्पर्धा तूर्तास रद्द करण्यात आली असून, पुढील काळात त्यासाठीच्या नव्या तारखा जाहीर होऊ शकतात. पण, सध्या प्राधान्य हे खेळाडू आणि त्यांच्या आरोग्यालाच देण्यात आलं आहे.
खेळाडूंच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड केली जाणार नसून, यंदाच्या स्पर्धेत सहभागी सर्व खेळाडू आणि इतरही व्यक्तींची पूर्ण जबाबदारी बीसीसीआय घेत असल्याचं प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात म्हटलं गेलं आहे.