मयताची ओळख अद्याप पटली नाही
गेवराई- बाग पिंपळगावच्या पुलाखाली एका ५५ वर्षीय इसमाचा मृतदेह आढळून आला आहे. या मयताची ओळख अद्याप पटली नसून कोणास काही माहिती असल्यास त्यांनी गेवराई पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. बागपिंपळगावच्या पुलाखाली एक इसम बेशुद्ध पडून असल्याची माहिती गेवराई पोलीसांना झाल्यानंतर पोलीसांनी त्याला गेवराईच्या रुग्णालयात आणले. डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्याला मृत घोषीत केले. या इसमाबाबत कोणास काही माहिती असल्यास त्यांनी गेवराई पोलीसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीसांच्या वतीने करण्यात आले आहे.