मुंबई : बॉलिवूड अभिनेता संजय दत्त यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. संजय दत्त यांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. त्यामुळे त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संजय दत्त यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यानंतर त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली आहे. मात्र सुदैवाने ही चाचणी निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे संजय दत्त यांना लीलावती रुग्णालयातील नॉन-कोव्हिड वॉर्डमध्ये भरती करण्यात आलं आहे.
दरम्यान जर त्यांची प्रकृती स्थिर राहिली तर त्यांना उद्या डिस्चार्जही देण्यात येईल, असे सांगितले जात आहे.