घातपाताचा संशय व्यक्त करण्यात येतोय
गेवराई तलवडा पोलिस ठाणे अंतर्गत राजापुर शिवारात एका ३२ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळला. मयताच्या तोंडावर माराच्या व गळ्यावर आवळल्याच्या खुणा असल्याने हा घातपाताचा प्रकार असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आल्यानंतर सदरचा मृत्यु बाबद घातपाताचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
या बाबद सविस्तर माहीती अशी की, गोळेगांव ता.गेवराई येथे भटक्या गोसावी समाजाचे काही कुटुंब पाल ठोकुन वास्तव्य करतात. त्यातीलच ज्ञानेश्वर तुकाराम चव्हाण वय ३२ वर्षे हा तरुण कुटुंबासह राहतो. त्याचा मृतदेह राजापुर शिवाराती एका शेतात आढळुन आला. त्याच्या चेहऱ्यावर जखमा व गळ्याला गळा आवळल्याची खुण आढळली आहे.त्यामुळे हा खूनाचा प्रकार असल्याची प्राथमिक माहीती समोर येत आहे. तो काल सायंकाळी एका अनोळखी इसमाच्या दुचाकीवर बसुन गेल्यानंतर परत आलाच नाही त्यानंतर त्याचा मृतदेहच आढळला असुन त्याचा खून झाल्याचा आरोप आई व पत्नीने केला आहे.
घटनेची माहीती मिळाल्यानंतर तलवाडा पोलिस ठाण्याचे सपोनि प्रताप नवघरे यांनी कर्मचारी कृष्णा वरकड, रामेश्वर खंडागळे, खाडे, राऊत यांच्यासह घटनास्थळी जावून पाहणी करत पंचनामा केला. व मृतदेह शवविछेदन करूण तपासणीसाठी साठी तलवाडा प्रा. आरोग्य केंद्रात पाठवला आहे. याबाबत रिपोर्ट आल्यानंतर तपासाची दिशा ठरेल अशी माहीती तलवाडा पोलीस ठाण्याचे सपोनि प्रताप नवघरे यांनी दिली आहे