कोरोनामुळे झाले निधन
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात हाहाःकार माजला आहे. या दुसऱ्या लाटेत वृद्धांसह तरुण लोकांच्याही मृत्यूचे प्रमाण वाढलेले दिसत आहे. कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेने महाराष्ट्रातील प्रसिद्ध बॉडीबिल्डर आणि मिस्टर इंडिया किताब जिंकलेल्या जगदीश लाड याचा मृत्यू झाला आहे. जगदीश अवघ्या 34 वर्षांचा होता. काही दिवसांपूर्वीच कोरोनाची लागण झाल्यानंतर त्याच्यावर वडोदऱ्यामधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.
जगदीश लाड हा नवी मुंबईत राहात होता. मागच्या वर्षीच त्याने गुजरातमधील वडोदरा येथे स्वतःची जीम सुरु केली होती. जगदीशला लहानपणापासून बॉडी बिल्डिंगची आवड होती. अतिशय पिळदार शरीरयष्टी असलेल्या जगदीशने महाराष्ट्रातील अनेक स्पर्धा जिंकल्या होत्या. काही दिवसांपूर्वीच कोरोनाची लागण झाल्यानंतर गुजरातमधील बडोदा येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. आज अखेर जगदीशची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. जगदशीसारख्या पिळदार शरीरयष्टी असलेल्या व्यक्तीला कोरोना हिरावून घेत असेल, तर सामान्यांनी याकडे अजून काळजी घेण्याची गरज आहे.