गेवराई- व्यापाऱ्याचा मृतदेह आढळला

गेवराई – तीन दिवसांपूर्वी एक व्यापारी मोटारसायकलसह पुलाच्या खाली कोसळला होता. त्याचा मृतदेह आज पुलापासून अंधरा किलोमीटर अंतरावर आढळून आला. कंपनीच्या चुकीमुळेच अपघात होत असून कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी मयताच्या नातेवाईकाकडून करण्यात आली.

विष्णू नन्नवरे हे तीन दिवसांपुर्वी मोटारसायकलवर गेवराईकडे येत होते. कोल्हेरजवळील पुलाच्या कठड्यावरून खाली त्यांची मोटारसायकल कोसळली. तीन दिवस त्यांचा मृतदेह सापडला नव्हता. आज सकाळी पुलापासून अर्धा कि.मी. अंतरावर मृतदेह आढळून आला. नन्नवरे यांचा अपघात पुलाला कठडा नसल्यामुळे झाला असून यापुर्वी आतापर्यंत अनेकांचा जीव कठड्याअभावी गेलेला आहे. ड्रिम कन्स्ट्रक्शनच्या वतीने पुलाचे काम करण्यात आले. त्यामुळे कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी मयताचे नातेवाईक सोमनाथ गिरके यांनी केली आहे.

error: Content is protected !!