हार्ट अटॅकमुळे झाले निधन
प्रसिद्ध न्यूज अँकर रोहित सरदाना यांचे हार्ट अटॅकमुळे निधन झाले, तसेच त्यांना कोरोनाचीही लागण झालेली होती. दिर्घकाळ ते झी न्यूजमध्ये अँकर होते. रोहित सरदाना सध्या आज तक न्यूज चॅनलमध्ये अँकर म्हणून काम करत होते. सुधीर चौधरी यानी ट्विट करुन त्यांच्या निधनाचे वृत्त दिले आहे.
बर्याच काळापासून टीव्ही माध्यमांचा चेहरा असलेले रोहित सरदाना सध्या ‘आज तक’ या वृत्तवाहिनीवर प्रसारित होणार्या ‘दंगल’ या कार्यक्रमाला अँकरींग करायचे. 2018 मध्येच रोहित सरदाना यांना गणेश शंकर विद्यार्थी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनीही रोहित सरदाना यांच्या मृत्यूची माहिती दिली आहे. ट्विटरवर श्रद्धांजली अर्पण करताना ते म्हणाले, ‘मित्रांनो, ही अत्यंत वाईट बातमी आहे. प्रसिद्ध टीव्ही न्यूज अँकर रोहित सरदाना यांचे निधन झाले आहे. आज सकाळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. त्यांच्या कुटूंबियांबद्दल तीव्र संवेदना. ‘