ग्रामीण भागातील नागरिक तसेच तेथील शेतकरी भयभीत
राज्यासह बीड जिल्ह्यात सर्वत्र कोरोना विषाणूचा कहर सुरु आहे. आशा भयंकर परिस्थितीमध्ये बीड जिल्ह्यातील किल्ले धारूर येथील कोविडं सेंटरची धक्कादायक माहिती समोर आली आहे. किल्ले धारूर येथील कोविडं सेंटर मधून सकाळी पंधरा ते वीस कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण शौचालयासाठी मोकळ्या जागेमध्ये जातात व रस्त्यावर वावर करताना दिसल्यामुळे तिथून जाणाऱ्या ग्रामीण भागातील नागरिक तसेच तेथील शेतकरी भयभीत झाले आहेत यासाठी एवढे ऋण बाहेर फिरतात कसे व तेथील कर्मचारी करतात तरी काय असा प्रश्न नागरिकांना पडला आहे तरी याचा बंदोबस्त करावा.