कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी घेतला निर्णय
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता आणि कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्यात आता 15 मे पर्यंत लॉकडाऊन कायम राहणार आहे. राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी यासंदर्भातील आदेश काढले आहेत. राज्य सरकारने लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे आणि यापूर्वी ब्रेक द चेन अंतर्गत लागू असलेले सर्व नियम या कालावधीत लागू असणार आहेत.
या कठोर निर्बंधांच्या संदर्भात राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी दिली आहे. हे निर्बंध राज्यात 15 मे रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत लागू असणार आहेत. राज्य सरकारने ब्रेक द चेन अंतर्गत राज्यात कठोर निर्बंध लागू केले होते आणि त्याचा परिणाम म्हणजे राज्यातील कोरोना बाधितांच्या रुग्णवाढीला ब्रेक लागल्याचं पहायला मिळत आहे. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पुन्हा एकदा लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्याबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा होत होती. त्यानुसार काल मंत्रिमंडळाच्या बैठकीतही लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय झाला आणि आज अखेर लॉकडाऊनचा कालावधी 15 दिवसांनी वाढवण्याचं जाहीर करण्यात आलं आहे.