बीडमध्ये होणार RTPCR
बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे, बीड विधानसभा मतदारसंघाचे आ. संदीप क्षीरसागर यांच्या प्रयत्नातून, ना. मुंडे यांनी जिल्ह्याच्या कोविड आढावा बैठकीत शब्द दिल्याप्रमाणे बीड जिल्हा रुग्णालयात कोविड-19 विषाणू चाचणी आर टी पी सी आर साठीची व्ही आर डी एल लॅब मंजूर करण्यात आली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने याबाबतचा शासन निर्णय आज उशिरा जारी केला आहे.
या निर्णयांतर्गत बीड जिल्हा रुग्णालयात आर टी पी सी आर चाचण्या करण्यासाठी प्रयोगशाळा उभारणे, त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ भरती करणे आदी बाबींना या निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आली आहे. या प्रयोग शाळेसाठी आवश्यक यंत्र सामग्री, उपकरणे आदींच्या खरेदीसाठी राज्य आपत्ती व्यवस्थापन निधी तसेच आवश्यकतेनुसार जिल्हा नियोजन समितीतून निधी उपलब्ध करून देण्यात येईल.