विनायक मेटे यांचा राज्य सरकारवर निशाणा
शिवसंग्राम चे नेते विनायक मेटे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. आरोग्य मंत्र्यांनी आपला वेळ इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यासाठी आणि लोकांना दिलासा देण्यासाठी द्यावा, परंतु या सरकारला कावीळ झाला आहे. प्रत्येक गोष्टीचा संदर्भ केंद्राशी जोडायचा आणि केंद्रावर सगळे ढकलायचं, राज्य सरकार स्वतःच्या खिशाला चाट लावून काहीच करत नसल्याचा आरोप देखील यावेळी मेटे यांनी केला आहे.
सरकार झोपा काढत आहे का.? तिन्ही पक्षांमध्ये चढाओढ सुरू असून आरोग्यमंत्र्यांनी केंद्राकडे बोट दाखवण्यापेक्षा रेमडीसिविर इंजेक्शनचा होणारा काळाबाजार रोखावा, सरकारच्या मंत्र्यांकडे रेमडीसिविर येतंच कसं असा सवाल देखील मेटेंनी उपस्थित केलाय, आरोग्यमंत्र्यांनी काहीतरी कर्तुत्व दाखवून द्यावं असं देखील मेटे म्हणाले आहेत.