अंथरवण पिंप्री शिवारात घडली
मेन लाईट बंद करत असताना एका 30 वर्षीय तरुणाला विजेचा शॉक बसून सदरील तरुण जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी साडे नऊ वाजता अंथरवण पिंप्री शिवारात घडली. घटनास्थळी पोलीस दाखल झाले होते.
ओम रामप्रसाद राऊत (वय 30, रा. म्हाळसापूर) हा तरुण अंथरवणपिंप्री शिवारात असलेली विजेची मेनलाईन बंद करण्यासाठी गेला होता. या वेळी त्याला विजेचा जबरदस्त शॉक लागल्याने तो जागीच ठार झाला. घटनेची माहिती पिंपळनेर पोलीसांना झाल्यानंतर पिंपळनेर ठाण्याचे सानप, सोनवणे घटनास्थळी दाखल झाले होते.