बीड, दि. 8 : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने शहरातील सर्व व्यापार्यांची अॅन्टीजन तपासणी करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी घेतल्यानंतर शनिवारी सकाळपासून तपासणीला सुरूवात करण्यात आली आहे. काल दिवसभरात 2601 व्यवसायिकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 86 जण पॉझीटीव्ह आढळून आले असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे सीईओ अजित कुंभार यांनी दिली आहे.शहरातल्या 6 केंद्रावर ही तपासणी होत आहे
.दरम्यान काल दिवसभरात बलभीम कॉलेज बीड याठिकाणी 242 टेस्टपैकी 11 जण पॉझीटीव्ह आढळले आहेत. तसेच मॉ वैष्णवी पॅलेस एमआयडीसी रोड बीड या केंद्रावर 396 जणांची टेस्ट करण्यात आली, त्यापैकी नऊ जणांना कोरोनाची लागण असल्याचे निष्पन्न झाले, जिल्हा परिषद शाळा अशोक नगर बीड याठिकाणी 384 जणांची टेस्ट करण्यात आली, त्यापैकी 16 जण पॉझिटीव्ह आढळून आले. राजस्थानी विद्यालय विप्रनगर बीड याठिकाणी 551 जणांची टेस्ट करण्यात आली त्यापैकी 20 जण पॉझिटीव्ह आढळून आले. चंपावती प्राथमिक शाळा बुथ क्र 1 नगर रोड बीड याठिकाणी 455 जणांची टेस्ट करण्यात आली त्यापैकी 11 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले तसेच चंपावती प्राथमिक शाळा बुथ क्र 2 नगर रोड बीड याठिकाणी 473 जणांची टेस्ट करण्यात आली त्यापैकी 19 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले.