बीड : जिल्ह्यातील खेड्यापाड्यापर्यंत कोरोना पसरला आहे. गावागावांत रुग्ण सापडत असून आज रविवारी 1 हजार 237 जण कोरोनाबाधित आढळले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे दिवसभरात 1 हजार 34 जणांनी कोरोनवर यशस्वी मात केल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. तसेच उपचारादरम्यान 20 जणांचा मृत्यू झाला.
बीड जिल्ह्यातील 4 हजार 771 जणांच्या तपासणीचा अहवाल दुपारी प्राप्त झाला. यात 1 हजार 237 जण कोरोनाबाधित आढळले. यात असंख्य रुग्ण ग्रामीण भागातील असून आता गावागावांत रुग्ण सापडू लागले आहेत. अख्खे कुटुंबच्या कुटुंब कोरोना पॉझिटिव्ह होऊ लागले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे आज दिवसभरात 1 हजार 34 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. दुर्देवाने उपचार घेताना 20 जणांचा मृत्यू झाला आहे. बीड जिल्ह्यात आतापर्यंत 844 जणांचा मृत्यू झाला आहे. एकुण कोरोनाबाधितांची संख्या 47 हजार 292 वर जाऊन पोहोचली आहे, तर कोरोनातून मुक्त झालेल्यांची संख्या 40 हजार 857 एवढी झाली आहे. बीड जिल्ह्याचा रिकव्हरी रेट 86.40 एवढा आहे.