केजमध्ये महिलेचा खून

35 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळला रस्त्यावर

(25 एप्रिल) केज तालुक्यातील केज कळंब रोडवर असलेल्या साळेगाव येथे अंदाजे 35 वर्षीय महिलेचा मृतदेह रस्त्यावर आढळून आला आहे. या घटनेनं सर्वत्र खळबळ उडाली आहे. साळेगाव येथील कळंब कडे जाणाऱ्या पुलाजवळ एका अंदाजे 35 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळला आहे.

सदरील महिलेच्या तोंडावर तीक्ष्ण हत्याराचे वार दिसत असून बाजूला मिरची पावडर तसेच एक घड्याळ निदर्शनास आले आहे. तर एक व्यक्ती गंभीर जखमी अवस्थेत तिथे असल्याचे सांगितल्या जातात असून त्याला उपचारासाठी हलवण्यात आले आहे. या घटनेचा पुढील पोलीस करत आहेत.

error: Content is protected !!