कोरोनामुक्त सचिनने वाढदिवसा दिवशी केली ‘ही’ मोठी घोषणा

सचिन करणार प्लाझ्मा दान

(24 एप्रिल) – सचिन तेंडुलकर नुकताच कोरोनातून बरा होऊन घरी परतला आहे. आज त्याचा वाढदिवस असून या निमित्ताने त्याने प्लाझ्मा दान करण्याची घोषणा केली आहे. मी जेव्हा पात्र असेल तेव्हा मी प्लाझ्मा दान करणार असल्याचे सचिनने सांगितले. सचिन 27 मार्चला कोविड 19 पॉझिटिव्ह आढळला होता. खबरदारी म्हणून काही काळ त्याला रुग्णालयातही दाखल करण्यात आले होते.

सचिनने आपल्या ट्विटर हँडलवर प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटलंय, की ‘मला एक संदेश द्यायचा आहे. जो डॉक्टरांनी मला देण्यास सांगितला आहे. मी प्लाझ्मा दान केंद्राचे उद्घाटन केले आणि त्यांचा संदेश होता, जर योग्य वेळी प्लाझ्मा दिला गेला तर रुग्ण लवकर बरे होऊ शकतात. ते म्हणाले, की ‘जेव्हा मी पात्र होईल तेव्हा मी प्लाइमा दान करेल आणि मी माझ्या डॉक्टरांशी बोललो.’

तेंडुलकरला 8 एप्रिलला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला होता. नंतर तो घरी आयसोलेट होता. प्लाझ्मा देण्यापूर्वी व्यक्तीला 14 दिवसांपर्यंत कोणतीही लक्षणे नसावी. या अनुभवी फलंदाजाने कोविड 19 मधून बरे झालेल्यांना प्लाझ्मा दान करून इतरांना मदत करण्यास सांगितले आहे.

error: Content is protected !!