संतप्त नातेवाईक आणि एजन्सी चालकांमध्ये बाचाबाची
(२३ एप्रिल) – बीड मध्ये रेमडीसिविर इंजेक्शनचा गोंधळ सुरूच आहे. बीड शहरातील प्रिया एजन्सीमार्फत इंजेक्शनच वाटप केलं जातंय. त्यामुळे नातेवाईकांनी याठिकाणी मोठी गर्दी केलीय. रेमडीसिविर मिळवण्यासाठी मागील 3 दिवसांपासून रुग्णांच्या नातेवाईकांनी अर्ज केले आहेत. माञ अद्यापही इंजेक्शन मिळाले नसल्यानं याचा गोंधळ सुरूच आहे.
जिल्हा प्रशासनाकडून अचानक इंजेक्शन वाटपाचे सेंटर बदलले जातेय. त्यामुळे नातेवाईकांचा गोंधळ उडतोय. बीड मधील एकाच खाजगी एजन्सी मार्फत याचे वाटप केले जात असल्यानं याठिकाणी नातेवाईकांनी मोठी गर्दी केली आहे. एक एका इंजेक्शनसाठी अनेक जण मागील 3 दिवसांपासून फिरत आहे. त्यामुळे संतप्त नातेवाईक आणि एजन्सी चालकांमध्ये बाचाबाची सुरू आहे.