गेवराई- विजेचा शॉक लागून एकाचा जागीच मृत्यु

मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात रवाना

(23 एप्रिल )- काल दि. २१ एप्रिल रोजी सकाळी शेतातील पिरास (देवाला) पाणी घालण्यासाठी गेलेल्या एकाचा शॉक लागून जागीच मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना गेवराई तालुक्यातील लुखामसला येथे घडली.

पांडुरंग विठ्ठल खुपसे असे शॉक लागून मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे. ते काल सकाळी सातच्या सुमारास शेतातील पिरास पाणी घालण्यासाठी गेले होते. त्या वेळी त्यांना शॉक लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती गेवराई पोलीसांना झाल्यानंतर घटनास्थळी पोहचून पोलीसांनी घटनेचा पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात रवाना केला.

error: Content is protected !!