राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल

ब्रीच कँडी रुग्णालयात करण्यात आली छोटी शस्त्रक्रिया

(21 एप्रिल )- राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांना पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर छोटी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यासाठी शरद पवार यांना कालच रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पुन्हा एकदा पवारांवर छोटी शस्त्रक्रिया झाली. गेल्या जवळपास 21 दिवसात शरद पवारांवरील ही तिसरी शस्त्रक्रिया आहे. यापूर्वी शरद पवार यांच्यावर 12 एप्रिलला पित्ताशयावर यशस्वीपणे पार पडली होती. त्याआधी शरद पवारांना 30 मार्चला ब्रीच कॅण्डी रुग्णालयातच दाखल करण्यात आलं होतं.

30 मार्चला पोटात दुखत असल्याने ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्यावर छोटीशी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर सात दिवस विश्रांतीचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. त्यानंतर 12 एप्रिलला पुन्हा एकदा त्यांच्या गॉल ब्लॅडरवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. ब्रीच कँडी हॉस्पिटलमधील डॉ. बलसरा यांनी ही शस्त्रक्रिया केली. यापूर्वीची शस्त्रक्रिया ही डॉ. अमित मायदेव यांनी केली होती. दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आजही ट्विट करुन, पवारांच्या प्रकृतीची माहिती दली. “आमचे पक्षाध्यक्ष शरद पवार साहेब काल संध्याकाळी मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात अॅडमिट झाले. त्यांच्यावर गॉल ब्लॅडर शस्त्रक्रिया झाली होती. त्याच्या नियमित तपासणीसाठी ते रुग्णालयात दाखल झाले. त्यांची प्रकृती सुधारत आहे”, असं नवाब मलिक म्हणाले.

error: Content is protected !!