अत्यावश्यक कामाच्या नावाखाली नागरिक रस्त्यावर
(दि.21 april) प्रशासनानं वारंवार सूचना देऊनही सूचनांचे पालन होत नाही परिणामी रुग्ण संख्या कमी होत नसून दररोज वाढत आहे. बीड जिल्ह्यातील माजलगाव आणि परळी शहरांमध्ये आज नागरिक रस्त्यावर उतरल्याचे चित्र दिसत आहे. शहरातील सर्वच दुकानं सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत होतं नागरिकांनी अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली बाहेर येत मार्केटमध्ये गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे.
परळी शहरातील मोंढा परिसरामध्ये नागरिकांनी मोठी गर्दी केली होती तर माजलगावच्या मुख्य बाजारपेठेत नागरिकांनी एकत्र येत सोशल डिस्टंसिंग पुरता फज्जा उडवला आहे लॉकडाऊन असून देखील जिल्ह्यामध्ये रोज हजाराहून अधिक रुग्ण आढळत आहेत असं असलं तरी बेफिकिरीने नागरिक रस्त्यावर फिरत असल्याचे चित्र सध्या जिल्हाभरात पाहायला मिळतय.