पाडव्याच्या सनानिमित्त आईला भेटायला आली होती बहीण
21 April -बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात बोरगाव येथील आईला पाडव्याच्या सनानिमित्त भेटायला आलेल्या बहिणीचा सख्या भावाने मित्राच्या मदतीने डोक्यात हत्याराने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शितल लक्ष्मण चौधरी असे या मयत महिलेचं नाव असून आरोपी तिचा सख्खा भाऊ दिनकर उर्फ दिनु गोरख गव्हाणे आहे तर यासोबत दुसरा आरोपी दिगंबर धनंजय वळेकर दोन्ही रा. बोरगाव असल्याचे समोर आले आहे.
या दोघांनी मिळून अज्ञात कारणावरून बहिणीच्या डोक्यात हत्याराने वार करून तिचा खून केला. केज तालुक्यातील बोरगाव येथे मंगळवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास उघडकीस आली. पोलिसात भावासह त्याच्या मित्रा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे येथून आईला केज तालुक्यातील बोरगाव येथे शितल लक्ष्मण चौधरी ही तिच्या मुलीला घेऊन बोरगाव येथे आली होती. मात्र तिचा मंगळवारी मध्यरात्री तिचा भाऊ दिनकर उर्फ दिनु गोरख गव्हाणे व त्याचा मित्र दिगंबर धनंजय वळेकर दोन्ही रा. बोरगाव यांनी अज्ञात कारणावरून बहिणीच्या डोक्यात हत्याराने वार करून तिचा खून केला.
मयत महिलेचा चुलत भाऊ नानासाहेब जालींदर गव्हाणे याने दिलेल्या फिर्यादी वरून केज पोलिस ठाण्यात दिनकर उर्फ दिनु गोरख गव्हाणे व त्याचा मित्र दिगंबर धनंजय वळेकर दोन्ही रा. बोरगाव यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच केज पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या सह पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन करत आहेत.