पालकमंत्र्यांनी आपलं आत्मपरीक्षण करावं

खासदार प्रीतम मुंडे यांनी पालकमंत्री धनंजय मुंडेंवर निशाणा

18 April :- बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी पालकमंत्री धनंजय मुंडेंवर निशाणा साधलाय. पालकमंत्र्यांनी आपलं आत्मपरीक्षण करावं, असा सल्ला प्रीतम मुंडेंनी धनंजय मुंडे यांना दिलाय. मी जिल्ह्याची लोकप्रतिनिधी म्हणून कधी कमी पडणार नाही. जिल्ह्यात औषधांचा तुडवडा असून आरोग्य यंत्रणेवर ताण येतोय. त्यामुळे या गोष्टीकडे सत्ताधार्यांनी बघण्याची आवश्यकता असल्याचं देखील प्रीतम मुंडे यांनी यावेळी सांगितले.

पंकजा मुंडे पालकमंत्री असताना जिल्ह्याला काही कमी पडलं नाही. आता पालकमंत्री फक्त श्रेयवादासाठी पुढे येत आहेत. जिल्ह्यात शेतकऱ्यांची दुर्दैवी परिस्थिती असून आताच सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गंभीर नसल्याचं विधान प्रीतम मुंडे यांनी केलं आहे. आज घेण्यात आलेल्या आरोग्य विभागाच्या आढावा दरम्यान त्या बोलत होत्या.

error: Content is protected !!