जिल्हावासीयांची चिंता वाढली ; आता कसं होणार?
18 April :- बीड जिल्ह्यात कोरोनाचा कहर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोनाला थोपवण्यासाठी कोरोनाचे लसीकरण सुरु करण्यात आले आहे. मात्र बीड जिल्ह्यातील सध्य तिथीला लसी अभावी लसीकरण केंद्र बंद पडली असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. मागील दोन दिवसांपासून लस उपलब्ध न झाल्यामुळे बीड जिल्ह्यातील लसीकरण केंद्र बंद पडली आहेत.
129 केंद्रावर जिल्ह्यामध्ये लसीकरण सुरू होतं. मात्र आता लसीच्या तुटवड्यामुळे ही सर्व केंद्र बंद पडली आहेत. आजही बीड जिल्ह्यामध्ये लस मिळालेली नाही परिणामी हे लसीकरण केंद्र बंदच राहणार असे चित्र आहे. प्रशासनानं आठवड्याला पन्नास हजार लसीची मागणी केली आहे. मात्र पुरवठा होत नसल्यामुळेे आता हे सर्वच केंद्र बंद करण्याची वेळ आली आहे.