प्रसिद्ध क्रिकेट पंच ब्रूस ऑक्सनफर्ड आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून घेणारा निवृत्ती

Famous cricket umpire Bruce Oxenford retires from international cricket

ऑस्ट्रेलिया : ऑस्ट्रेलियाचे प्रसिद्ध क्रिकेट पंच ब्रूस ऑक्सनफर्ड यांनी गुरुवारी (२८ जानेवारी) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. आपल्या कारकिर्दीत त्यांनी १५ वर्षांहून अधिक काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांमध्ये पंचगिरी केली आहे. २०१२ पासून आयसीसीच्या पंचांच्या एलिट पॅनलचे नियमित सदस्य असलेले ऑक्सनफर्ड यांनी १०६ वनडे, ६३ कसोटी, ३१ टी२० सामन्यात पंचाची भूमिका साकारली आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील ब्रिस्बेन कसोटी सामना त्यांचा पंचगिरी करण्याचा शेवटचा सामना ठरला

ऑक्सनफर्ड यांनी जानेवारी २००६ मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघातील टी२० सामन्याने त्यांच्या पंच कारकिर्दीचा श्रीगणेशा केला होता. त्यांनी मागील ३ वनडे आणि टी२० विश्वचषकात पंचगिरी केली आहे. सोबतच त्यांनी महिलांच्या 2012 व 2014 मधील विश्‍वकरंडक टी-20 स्पर्धेतही पंच म्हणून काम केले आहे. पंच होण्यापूर्वी ऑक्‍सेनफोर्ड यांनी क्वीन्सलॅंड संघाचे प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व केले आहे. ते लेग स्पिनर होते.

‘मी आयसीसी, क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि आयसीसी एलिट तथा आंतरराष्ट्रीय पॅनलच्या माझ्या सर्व सहकाऱ्यांचे आभार मानू इच्छितो. त्यांनी एवढे वर्षे मला प्रोत्साहित केले आहे. खासकरून क्रिकेटमुळे मला भेटलेल्या काही शानदार व्यक्तींना पाहणे, त्यांच्याशी चर्चा करणे या सर्व गोष्टींची खूप आठवण येईल’, असे त्यांनी पुढे बोलताना म्हटले.

ऑक्सनफर्ड यांनी निवृत्ती जाहीर केल्यानंतर आयसीसीशी बोलताना म्हटले की, ‘मी एका पंचाच्या रुपात माझ्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला अभिमानास्पद समजतो. मला विश्वासच नाही होत की, मी २००पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय सामन्यात पंचगिरी केली आहे. मी एवढ्या मोठ्या कारकिर्दीची अपेक्षा केली नव्हता.’

error: Content is protected !!