चाकणकर लाली लिपस्टीक लावलेले तोंड घेऊन कुठे लपतात ?

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या महाराष्ट्र अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या वाचाळपणा विरुद्ध रिपब्लिकन पक्षाच्या महिला आघाडी तर्फे आक्रमक होत रुपाली चाकणकर यांच्या फोटोला काळे फासून लत्ताप्रहार करीत आझाद मैदान येथे जोरदार निषेध आंदोलन केले.

शेतकरी आंदोलनाला प्रसिद्धी स्टंट असे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले नसताना त्यांच्या विरुद्ध अपप्रचार करणाऱ्या रुपाली चाकणकर यांचा रिपाइं महिला आघाडीच्या महाराष्ट्र अध्यक्षा ऍड. आशा लांडगे, मुंबई अध्यक्षा ऍड.अभया सोनवणे, उषाताई रामळू, नैना वैराट, जयश्री कांबळे, मुंबईचे युवा आघाडी अध्यक्ष रमेश गायकवाड, सोनान कांबळे आदी अनेक मान्यवरांच्या नेतृत्वात रुपाली चाकणकर यांच्या विरुद्ध तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले.

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शेतकऱ्यांचा कोणत्याही प्रकारे अवमान केला नाही तर नेहमी शेतकऱ्यांसाठी, शेतमजुरांसाठी, भूमीहिंनांसाठी भूमिका घेतली आहे. गरिबांच्या मदतीला धावून जाणारे, दलितांवर अन्याय होईल तिथे न्याय मिळवुन देण्यासाठी पोहोचणारे संघर्षशील नेतृत्व असे रामदास आठवले हे संघर्षनायक आहेत.

‘दलित महिलांवर अत्याचार झाल्यावर रुपाली चाकणकर लाली लिपस्टीक लावलेले तोंड घेऊन कुठे लपवून बसलेली असते असा संतप्त सवाल रिपाइं महिला आघाडी ने विचारला आहेअत्याचार पीडित दलित महिलांच्या मदतीला कधी आल्या का या चाकणकर बाई ?’ असा सवाल रिपाइंच्या मुंबई अध्यक्षा ऍड.अभया सोनवणे यांनी केला आहे.

दरम्यान, ‘पुण्यात रुपाली चाकणकर यांच्या निवासस्थानी रिपाइं महिला आघाडीच्या नेतृत्वात शेकडो महिला कार्यकर्त्यांनी निषेध आंदोलन केले. गल्लीत कार्यकर्त्यांनी दिल्लीतील नेत्यांवर खोटे आरोप करून टीका करून नये. टीका करण्याचा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार असला तरी त्या अधिकारा सोबत जबाबदारी ही असते. ज्यांच्यावर टीका करायची त्यांच्या विधानाची सत्यता तपासून टीका करावी,’ असे मत रिपाइं च्या पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडी अध्यक्षा संगीता आठवले यांनी व्यक्त केले.

error: Content is protected !!