बीड शहरातील महिला बचत गटांची ओळख राज्यात- माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर

बीड- बीड शहरातील महिला बचत गटांची ओळख आता संपूर्ण राज्यभर पसरली आहे चिकाटी आणि निष्ठेने आमच्या महिला भगिनींनी यशस्वीपणे बचत गट चालू केले आहेत याचा सार्थ अभिमान वाटतो महिला स्वावलंबी व्हावी यासाठी त्यांना सहकार्याची गरज असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले आहे

बीड नगरपालिकेच्या वतीने दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरिक उपजीविका अभियान महिला बचत गट मिळावा तसेच दिव्यांग लाभार्थ्यांना अनुदान वाटप यांचा सत्कार आणि स्वच्छ सर्वेक्षण 2021 या स्पर्धेतील पारितोषिकाचे वितरण माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर दिलीप गोरे मुख्याधिकारी डॉ उत्कर्ष गुट्टे नगरसेविका गुंजाळ, पिंगळे सादेकअली शेख इलियास किशोर पिंगळे गजानन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मन्मथ स्वामी आदि उपस्थित होते
यावेळी बोलताना माजी मंत्री क्षीरसागर म्हणाले की महिला सक्षम झाल्याने हक्काने बोलू लागले आहेत हक्काने वावरू लागले आहेत स्वतःचा वल्लम स्वावलंबी झाल्यामुळे स्वतःचा संसार यशस्वीरित्या करू लागल्या आहेत,स्व काकूंचे हेच मुख्य ध्येय होते, बीडमध्ये महिला बचत गटांची संख्या आता वाढू लागले आहे त्यांना अर्थसहाय्य म्हणून गजानन बँकेने बचत गटांना कर्ज वाटप केले आहे यापुढेही मार्चपर्यंत शंभर बचत गटांना टक्क्याने निधी उपलब्ध करून दिला जाणार जाणार असून येत्या दोन महिन्यात कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात येण्याचा अंदाज आहे गेल्या दहा महिन्यात यात अनेक संसार अडचणीत आले तेव्हा बचत गटातील महिलांनी सक्षमपणे स्वतःचा संसार सांभाळला ही जमेची बाजू आहे खादी ग्रामोद्योग च्या माध्यमातून अनेक योजना आहे बचत गटांना त्यातून सबसिडीचा लाभ होऊ शकतो मोठ्या शहरातील उद्योजकांना बीडमध्ये आणून बचत गटाचा मेळावा घेऊन त्यांच्या उत्पादनाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत आपल्या सूतगिरणीच्या सुतापासून जर कपडा तयार करण्याचा व्यवसाय बचत गटांनी केला तर त्यांच्यासाठी आपण निश्चितच सहकार्य करू बीड शहराच्या विकासाची कामे आता सुरू झाली आहे येत्या काळात ते पूर्ण होतील आभासी कामे करण्यापेक्षा दूरदृष्टीने कामे झाली तर पुढच्या पिढीला त्याचा फायदा होतो असे सांगून उपस्थित बचत गटाच्या महिलांना त्यांनी आणखी मेहनतीने काम करावे यासाठी प्रोत्साहन दिले
यावेळी नगराध्यक्ष डॉ क्षीरसागर म्हणाले की, बीड नगरपालिकेच्या वतीने 56 महिला बचत गटांना प्रत्येकी दहा हजार मदत निधी आपण उपलब्ध करून दिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्यासाठी नगरपालिकेच्या वतीने सातत्याने प्रयत्न केले जाते बीडमध्ये जवळपास तेराशे महिला बचत गट स्थापन झाले आहेत यामध्ये 200 बचत गटांना कर्ज उपलब्ध करून दिले आहे हा निधी वेगवेगळ्या योजनेतून उपलब्ध झाल्यामुळे बचत गटांना त्याचा फायदा झाला आहे शहरातील बचत गटांनी खूप उत्कृष्ट उत्पादने तयार केली आहेत त्यांना बाजारपेठ मिळण्यासाठी आता महिला बचत गटांना भाजी मंडई परिसरात स्वतंत्र स्टॉल उपलब्ध करून देत आहोत एवढेच नव्हे तर मोठ्या शहरात या उत्पादनाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहोत लोकप्रतिनिधी म्हणून कर्तव्य भावनेतून आम्हाला जे जे करता येईल ते करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत असे ते म्हणाले यावेळी शहरातील बचत गटाच्या महिला प्रतिनिधीनी देखील आपले मनोगत व्यक्त केले तर आभार किशोर पिंगळे यांनी मानले यावेळी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या

error: Content is protected !!