बीड- बीड मतदारसंघातील 29 ग्रामपंचायत पैकी 3 ग्रामपंचायत बिनविरोध निवडून आल्या आहेत
बीड जिल्ह्यात 129 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज अर्ज मागे घेण्याचा दिवस होता बीड मतदारसंघात 29 ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आज अर्ज मागे घेण्याच्या दिवशीच माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली तीन ग्रामपंचायत बिनविरोध निवडून आले आहेत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे माजी जिल्हाप्रमुख अनिल जगताप,बाळासाहेब पिंगळे,गोरख शिंगण, नितीन धांडे, बप्पा साहेब घुगे,जगदीश काळे,विलास बडगे,अरुण डाके दिनकर कदम राजेंद्र राऊत वैजनाथ तांदळे संदीप डावकर सखाराम मस्के यांच्या प्रयत्नातून ग्रामपंचायत वंजारवाडी,काठवट वाडी, कोळवाडी या 3 ग्रामपंचायत बिनविरोध निवडून आल्या आहेत तर कारळवाडी येथील 7 पैकी 3 सदस्य बिन विरोध निवडून आले आहेत
शिवसेनेच्या शिवशाही पॅनल ने सुरुवातीलाच हे घवघवीत यश प्राप्त केले आहे उर्वरित 24 ग्रामपंचायत पैकी बहुतांशी ग्रामपंचायत वर भगवा फडकेल असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे या तिन्ही ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सदस्यांचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर आणि युवा नेते डॉ योगेश क्षीरसागर यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत शिरूर तालुक्यात ही सात ग्रामपंचायत निवडणुका होत असून यावरदेखील भगवा फडकेल असा विश्वास जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी व्यक्त केला आहे