पोलिस आयुक्तांनी मंगल कार्यालय व्यावसायिकांना बजावल्या नोटिसा

औरंगाबाद, दि. २१ – मंगल कार्यालय हे गर्दीचे ठिकाण आहे. अशा या गर्दीच्या ठिकाणी गुन्हा/अपराध घडू नये म्हणून पोलिस आयुक्तांनी आज, २१ डिसेंबर रोजी औरंगाबाद शहर परिसरातील मंगल कार्यालय व्यावसायिकांची बैठक घेतली. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून गुन्हेगारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी निर्माण होणाऱ्या प्रश्नाबाबत चर्चा या बैठकीत करण्यात आली. तसेच सर्व व्यावसायिकांना काटेकोरपणे नियमावली पालन करण्याचे निर्देश दिले असून फौजदारी दंड प्रक्रिया संहिता कलम १४९ प्रमाणे नोटिसा दिल्या.mangal karyal Business Meeting 21 December 2020

आज, २१ डिसेंबर रोजी पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त अशोक बनकर औरंगाबाद शहर यांच्या उपस्थितीमध्ये मिल कॉर्नर येथील पोलीस आयुक्त कार्यालयात मंगल कार्यालय व्यवसायीकांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत पोलीस आयुक्त यांनी मंगल कार्यालय व्यवसायीक यांच्यामुळे कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून गुन्हेगार याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी निर्माण होणाऱ्या प्रश्नाबाबत चर्चा केली. त्यामध्ये मंगल कार्यालय व्यवसायीकांकडून ज्ञात/अज्ञातपणे अनेक तरतुर्दीचा भंग होतो.औरंगाबाद शहरात वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी व मंगल कार्यालयात वाढते चोरीचे प्रमाण यातून मंगल कार्यालय व्यावसायीक यांनी काय काळजी घेतली पाहिजे, काय माहीती ठेवली पाहिजे यावर चर्चा करण्यात आली.

मंगल कार्यालय हे मोठे गर्दीचे ठिकाण आहे. मंगल कार्यालयात होणारे अपराध कधी हाणामारी, दारु पिऊन धिंगाणा घालणे, महिला विरुध्द अपराध, अपहरण यासारखे अपराध होऊ शकतात. तसेच मंगल कार्यालयातील विदयुत यंत्राचा धक्का, Sound System मोठ्या आवाजात वाद्य वाजवणे, वाहतुकीस अडथळा निर्माण करणे, पार्ट्यांमध्ये अंमली पदार्थाचे सेवन, मंगल कार्यालयातील अन्न पदार्थ वगैरे अयोग्य विल्हेवाट, सुरक्षाविषयक पुरेशी काळजी न घेणे तसेच CCTV कॅमेरे बसवलेले नसणे, सुरक्षा गार्ड न नेमणे, गाड्या पार्किग समस्या त्यातून मोटर सायकल चोरीचे प्रमाण या सर्व घटनांना अटकाव करण्यासाठी व पोलीस आयुक्त यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे आदेशाचे पालन केले नाही तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच मंगल कार्यालय व्यावसायीक यांना मंगल कार्यालया संबधी इतर सविस्तर सूचना या बैठकीमध्ये देण्यात आल्या.

त्याचप्रमाणे मंगल कार्यालय व्यावसायिक यांनी मंगल कार्यालयामध्ये येणारा कामगार वर्ग त्यामध्ये गार्डनमध्ये काम करणारा, पार्किंगमध्ये काम करणारा, Sound System साठी, विवाहाच्या वेळी, केटर्स, फोटोग्राफी व इतर कामगार वर्ग यांची संपूर्ण माहीती ठेवावी. त्याप्रमाणे कोणत्या ठिकाणी एखादी घटना घडली तर तात्काळ स्थानिक पोलीसांना अवगत करावे. याबाबत फौजदारी दंड प्रक्रिया संहिता कलम १४९ प्रमाणे नोटीस दिल्या. ही बैठक १२.०० ते १३.०० दरम्यान पोलीस आयुक्त कार्यालय मिल कॅार्नर औरंगाबाद शहर येथे पार पडली. या बैठकीसाठी ७० ते ८० मंगल कार्यालय व्यावसायीक हजर होते.

error: Content is protected !!