मुंबई | भाजपमध्ये काम केलेला माणूस इतर पक्षात रमतच नाही, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. माजी आमदार बाळासाहेब सानप हे पुन्हा भाजपमध्ये गेले आहेत. त्यावेळी पाटील बोलत होते.(Former MLA Balasaheb Sanap has rejoined the BJP. Patil was talking at that time)
विरोधकांकडून होणाऱ्या ट्रोलिंगला आपण घाबरत नसल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. पाटलांना सोशल माध्यमांवर ‘चंपा’ नावाने चिडवलं जातं. मात्र पाटलांनी आपण ट्रोलिंगला घाबरत नसल्याचं सांगितलं.
भाजपमधून राष्ट्रवादीत, त्यानंतर शिवसेनेत आणि आता परत एकदा भाजपमध्ये माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी फडणवीस म्हणाले की, ‘येत्या काळात भाजप पक्षात अनेकांचा प्रवेश होणार आहेत.’ (On this occasion, Fadnavis said, “Many will join the BJP in the near future.”)
दरम्यान, विधीमंडळाच्या अधिवेशनात येत्या चार महिन्यात तुमचे आमदार राजीनामे देऊन आमच्याकडे येतील हे तुम्हाला कळणार नसल्याचा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajeet Pawer) यांनी केला होता.