प्राप्तिकर निरीक्षक प्रताप चव्हाण याने वैद्यकीय व्यावसायिकाकडून १० लाखांची लाच घेतली. रक्कम मोठी असल्याने यामागे वरिष्ठ आहे का, या तपासासाठी पोलिसांनी दोन दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी केली. ॲड. विवेक शुक्ल यांनी सरकारी पक्षाकडून युक्तिवाद केला. चव्हाण केंद्रीय कर्मचारी आहे. त्याचे वरिष्ठ सहभागी आहेत का, हेदेखील पाहिले जाणार आहे. दहा लाख रुपये लाच घेणाऱ्या प्रताप चव्हाण याची केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय) चौकशी होण्याची शक्यता आहे, मात्र ही केस सीबीआयकडे द्यायची की नाही, याचा निर्णय राज्य सरकार घेणार आहे; मात्र शुक्रवारी (ता. १८) झालेल्या कारवाईचा अहवाल राज्य सरकारच्या गृह विभागाकडे पाठवण्यात येणार आहे. दरम्यान, आज न्यायालयाने चव्हाण याला दोन दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.
हे वाचा : राजकीय वातावरण अमित शहांमूळे तापले….
कारवाईचा अहवाल पोलिस अधीक्षक कार्यालयामार्फत गृह मंत्रालयाकडे पाठवला जाणार आहे. जर राज्य सरकारला आवश्यक वाटले तर हा तपास सीबीआयकडे हस्तांतरित केला जाईल; मात्र हा निर्णय राज्य सरकारचा असणार आहे, अशी माहिती बुधवंत यांनी दिली.