पतीच्या मोबाईलवर काढले प्रियकरासोबत अश्लील फोटो; डिलिट केले, पण पतीने केले रिकव्हर आणि मग जे घडले ते असे……

औरंगाबादः विवाह झाल्यानंतरही प्रियकरासोबत शारिरीक संबंध ठेवल्याचे अश्लील फोटो पतीच्या मोबाइलमध्ये काढले. मोबाइलमधून डिलीट केलेले फोटो पतीने पुन्हा रिकव्हर केले. हेच फोटो पती व दिराने पत्नीच्या मामासह इतर नातेवाईकांच्या मोबाइलवर व्हायरल केले.

याचा राग आल्यामुळे विवाहितेने पती, दिरावर फोटो व्हायरल केल्याचा तर प्रियकरावर थेट अत्याचाराचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी करत पोलिसांनाच आत्महत्येची धमकी दिली. अखेर चार पोलीस ठाणे फिरल्यानंतर एका ठाण्यात फोटो व्हायरल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. त्यातही हा गुन्हा आता वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे वर्ग करण्यात आला आहे.

चित्रपटाच्या कथेला शोभेल अशी ही घटना आहे

औरंगाबादची.क्रांतीचौक परिसरातील एका २० वर्षीय विवाहितेचे गेल्या दोन ते तीन वर्षापासून एका तरुणासोबत प्रेमप्रकरण सुरू होते. असे असतानाही तिने सेव्हन हिल भागातील एका तरुणासोबत विवाह केला. विवाहानंतर पतीच्या माघारी ही विवाहिता प्रियकरासोबत शारिरीक संबंध ठेऊ लागली. एके दिवशी ती चक्क पतीचा मोबाइल घेऊन प्रियकरासोबत फिरायला गेली. त्यावेळी तिने प्रियकरासोबत मोबाइलमध्ये फोटोसेशन केले. तेथून परतल्यानंतर तिने मोबाइलमधील फोटो डिलीट केले. त्यानंतर पुन्हा पतीचा मोबाइल घेऊन ती खुलताबादला गेली. तेथे प्रियकरासोबत अश्लील फोटो काढून तेही डिलिट केले. पण पत्नीच्या या गुलछबू कृत्याची भनक पतीला लागली. त्यामुळे त्याने मोबाइलमधून डिलिट केलेले सगळे फोटो रिकव्हर केले. फोटो पाहून पतीला धक्का बसला. त्याने हे पत्नीचे अश्लील फोटो थेट तिच्या मामासह इतर नातेवाईकांच्या मोबाइलवर व्हायरल केले. फोटो व्हायरल झाल्यामुळे आपली समाजात बदनामी झाली, असे म्हणत विवाहितेने पतीशी वाद घातला. या वादानंतर विवाहिता तिच्या माहेरी निघून गेली.

…मग पोलिसांनी सुरु केला हद्दीचा वाद

 विवाहितेने तक्रार देताना क्रांतीचौक पोलिसांना सांगितले की, माझ्या पती व दिराने प्रियकरासोबतचे अश्लील फोटो नातेवाईकांच्या मोबाइलवर व्हायरल केले आहेत. त्यामुळे आता पती व दिरावर फोटो व्हायरल केले म्हणून, तर प्रियकरावर त्याने माझ्यावर अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी केली. हा सगळा प्रकार ऐकून घेतल्यानंतर  पोलिसांमध्ये हद्दीचा वाद सुरू झाला. क्रांतीचौक पोलिसांनी या विवाहितेला सुरूवातीला जिन्सी पोलीस ठाण्याशी संपर्क साधून तेथे तक्रार देण्याचे सांगितले. त्यावर विवाहितेने जिन्सी पोलीस ठाणे गाठले. पण सेव्हन हिलमधील भाग जिन्सी पोलिसांच्या हद्दीत नसल्याने तिला पुंडलिकनगर पोलिसात तक्रार देण्याची सूचना केली. यानंतर पुंडलिकनगर पोलिसांनी प्रियकराविरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल करायचा असेल तर खुलताबाद पोलिसांशी संपर्क साधा, असे सांगितले. म्हणून तिने खुलताबाद पोलीस ठाणे गाठले. पुढे खुलताबाद पोलिसांनी तिला मूळ प्रकरण औरंगाबादेतून सुरू झाल्याने तेथेच तक्रार देता येईल, असे सांगून पाठवून दिले.

…आणि शेवटी तिने दिली आत्महत्येची धमकी

 चार पोलीस ठाणे फिरल्यानंतर पुन्हा या विवाहितेने नजीकचे क्रांतीचौक ठाणे गाठले. गुन्हा दाखल करा, अन्यथा येथेच आत्महत्या करते, अशी धमकी तिने क्रांतीचौक पोलिसांना दिल्यामुळे पोलिसांना नाईलाजास्तव पती व दिराविरुध्द फोटो व्हायरल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा लागला. या प्रकारानंतर हा गुन्हा पुंडलिकनगर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. मात्र, आयटी ऍक्टचा गुन्हा असल्यामुळे सहायक पोलीस निरीक्षकांना तपास करण्याचा अधिकार नाही, म्हणून हे प्रकरण आता पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन यांच्याकडे सोपवण्यात आले आहे.

error: Content is protected !!