प्रतीक्षा संपली.. भारतात या महिन्यात कोरोना लसीकरणास सुरुवात होणार, केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांचे संकेत

नवी दिल्ली : भारतातील कोरोना लसीची प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे. यासाठीचे संकेत स्वतः केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिले आहेत. त्यांनी रविवारी सांगितले की जानेवारीच्या कोणत्याही आठवड्यात आम्ही भारतात कोरोना लसीचा पहिला डोस देण्याच्या तयारीत आहोत.(corona vaccine start in india in January)

आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, “आमची पहिली प्राथमिकता लसींची सुरक्षा आणि परिणामकारकता आहे. आम्हाला यावर तडजोड करण्याची इच्छा नाही. मला वैयक्तिकरित्या वाटते की कदाचित जानेवारीच्या काही आठवड्यात आम्ही लसीकरणास सुरुवात करू.

error: Content is protected !!