मुंबई काँग्रेसचे नवे अध्यक्ष भाई जगताप

मुंबई : मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी भाई जगताप यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर चरणसिंग सप्रा यांची कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. शनिवारी रात्री अखिल भारतीय कमिटीनं या नियुक्त्या जाहीर केल्या. तसेच काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी त्यांना मंजुरी दिली आहे. मुंबई काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष आणि माजी खासदार एकनाथ गायकवाड यांच्याबाबत पक्षांतर्गत नाराजीचा सूर होता. त्यामुळेच हा खांदेपालट करण्यात आल्याचं बोललं जात आहे.

मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी अनेकजण इच्छुक होते. यामध्ये वर्षा गायकवाड, मिलिंद देवरा, चरणसिंह सप्रा, अस्लम शेख यांचा समावेश होता. विशेष म्हणजे, संजय निरुपम आणि मिलिंद देवरा यांच्यावर कोणतीही जबाबदारी पक्षाच्या वतीनं सोपवण्यात आलेली नाही. गेल्या काही दिवसांपासून मुंबई काँग्रेसमधील गटबाजी हा पक्षासाठी डोकेदुखीचा विषय ठरत होता. याआधी लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर संजय निरुपम यांच्याऐवजी मिलिंद देवरा यांच्याकडे मुंबई काँग्रेसचं अध्यक्षपद सोपवण्यात आलं होतं. मात्र मिलिंद देवरा यांनी फारसं चांगलं काम केलं नाही. तसेच काँग्रेसमधील अंतर्गत बंडखोरीही या काळात वाढली होती.

error: Content is protected !!