‘या’ कंपनीने केला मोठा घोटाळा

हैदराबादच्या एका कंपनीवर केंद्रीय तपास यंत्रणेने (सीबीआय) मोठा कर्ज घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. ट्रान्सस्ट्रॉय इंडिया लिमिटेड या कंपनीविरोधात त्यांनी अनेक बँकांना ८,००० कोटी रुपयांना फसवल्याचा आरोप ठेवला आहे अशी माहिती अधिकाऱ्यांकडून मिळत आहे.

हे वाचा : राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण…., छगन भुजबळांनी केलं मोठं विधान

हैदराबादची बांधकाम कंपनी आहे ट्रान्सस्ट्रॉय लिमिटेड

मागीलवर्षी सप्टेंबर महिन्यात राष्ट्रीय कंपनी कायदा लवादने महामार्ग, पूल, पाणीपुरवठा प्रकल्प, मेट्रोशी संबंधित बांधकामे या क्षेत्रातील ट्रान्सस्ट्रॉय या कंपनीविरोधात लिक्विडेशन प्रक्रियेत आदेश काढला होता. सीबीआयच्या बंगळुरू शाखेत दाखल केलेल्या एफआयआरमध्ये सीबीआयने रायापती सांबशिव राव आणि अक्किनेणी सतीश यांच्यावर गुन्हे दाखल केले आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सीबीआयच्या पथकांनी काल बंगळुरू आणि गुंटूर परिसरात छापेमारी केली आणि या घोटाळ्याशी संबंधित काही कागदपत्रेही जप्त केली. यावेळी संशयित व्यक्तीही तिथे हजर होत्या.

हे हि वाचा : पंतप्रधानांनी जाहीर केली तारीख, ‘या’ दिवशी जमा होणार PM किसानचे पैसे;

बँकांच्या कागदपत्रांचाही आहे घोटाळा

समोर आलेल्या माहितीनुसार या घोटाळ्यात खातेवह्यांची फेरफार, स्टॉक स्टेटमेंट्सचा घोळ, बॅलन्स शीटमध्ये पेरफार, पैशांची अफरातफर असे अनेक पैलू आहेत. सीबीआयचे प्रवक्ता आर. के. गौर यांनी माध्यमांना सांगितले, ‘असा आरोप केला जात आहे की संशयितांनी बँकेच्या पैशांची अफरातफर केली आणि बँकेने मंजूर केलेल्या कर्जांची रक्कम दुसरीकडे वळवून कॅनरा बँकेसह इतर सदस्य बँकांना ७९२६.०१ रुपयांना फसवले.’

नीरव मोदी घोटाळ्यापेक्षाही मोठी आहे रक्कम

या घोटाळ्याची एकूण रक्कम ही कुप्रसिद्ध नीरव मोदी घोटाळ्यापेक्षाही जास्त आहे. नीरव मोदी सध्या भारताबाहेर असून त्याला देशात आणण्याचे प्रयत्न चालू आहेत आणि सध्या तो इंग्लंडमधील एका कारागृहात आहे. तो भारतातील विविध बँकांचे ७,७०० कोटी रुपयांचे देणे बाकी आहे.

error: Content is protected !!