हे घडले नसते तर आज सलमान खान असता या अभिनेत्रीचा पती

सलमान लोकांच्या हृद्यावर राज्य करतो असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. सलमानची लोकप्रियता प्रचंड असून त्याचे चाहते त्याच्या आगामी चित्रपटांची आतुरतेने वाट पाहात असतात. बिग बॉस कार्यक्रमातील त्याचे सूत्रसंचालन देखील त्याच्या चाहत्यांना प्रचंड आवडते. सलमान खानने गेल्या काही वर्षांत एकाहून एक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. सलमानच्या वॉटेंड, दबंग, बॉडीगार्ड, एक था टायगर या चित्रपटांनी २०० कोटींहून अधिक व्यवसाय बॉक्स ऑफिसवर केला आहे. कोणताही अभिनेता आपले खाजगी आयुष्य मीडियापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतो. पण सलमान नेहमीच त्याच्या खाजगी आयुष्याविषयचे किस्से अनेक मुलाखतींमध्ये सांगत असतो. सलमानने काही वर्षांपूर्वी करण जोहरच्या कॉफी विथ करण या कार्यक्रमात हजेरी लावली होती. या कार्यक्रमात त्याने त्याच्या आयुष्यातील अनेक मजेदार किस्से सांगितले होते. या कार्यक्रमात सलमानने त्याच्या आणि संगीता बिजलानीच्या नात्याविषयी सांगितले होते.

हे वाचा : भात आणि बटाटे पुन्हा गरम करून खाल्याने शरीराचं होतंय मोठं नुकसान; जाणून घ्या कारण

सलमान आणि संगीता जवळजवळ १० वर्षे नात्यात होते. संगीता आणि सलमान इंडस्ट्रीत येण्याआधीच एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. १९८६ पासून ते नात्यात होते असे म्हटले जाते. संगीता आणि सलमान यांनी लग्न करण्याचे देखील ठरवले होते. त्यांच्या लग्नाच्या पत्रिकादेखील वाटल्या गेल्या होत्या. पण अचानक त्याचे संगीतासोबतचे लग्न मोडले. याविषयी सलमानने कॉफी विथ करणमध्ये सांगितले होते की, त्याचे लग्न ज्या मुलीसोबत ठरले होते, तिला तो फसवतो आहे हे तिला कळल्यामुळे तिने हे लग्न मोडले होते. सलमानच्या आयुष्यात सोमी अली आल्याने संगीताने लग्न करण्यास नकार दिला असे म्हटले जाते. त्या घटनेनंतर संगीताने भारतीय क्रिकेट टीमचा माजी कप्तान मोहोम्मद अझरुद्दीनसोबत लग्न केले तर सलमानने सिंगल राहाणेच पसंत केले.

हे वाचा : निम्म्याहून अधिक भारतीय दहशतीत, सर्व्हेतून खुलासा; कोरोनाची लस घेणार का?

संगीता आणि सलमान यांचे लग्न मोडल्यानंतर देखील त्यांनी त्यांच्यात असलेले मैत्रीचे नाते टिकवून ठेवले आहे. आजही सलमानच्या घरगुती कार्यक्रमात संगीता आवर्जून हजेरी लावते. सलमानच्या लग्नाचा हा किस्सा सलमानचा मित्र आणि निर्माता साजिद नाडियाडवालाने देखील काही दिवसांपूर्वी द कपिल शर्मा शो या कार्यक्रमात सांगितला होता.

error: Content is protected !!