इअर एंड म्हणजेच डिसेंबर 2020 मध्ये विविध कंपन्यांनी गाड्यांवर जबरदस्त सूट देण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे या यादीत अनेक गाड्यांचा समावेश आहे. कोरोनाच्या काळात मंदावलेले वाहन उद्योग आणि वाहन खरेदी यानां अनलॉक नंतर गती मिळाली आहे. तर आता वर्षाच्या शेवटी कार खरेदीदारांना मोठी वाहन खरेदीवर भरघोस सूट मिळवण्याची संधी मिळाली आहे.
हे वाचा : सांगली मध्ये “रात्रीस खेळ चाले’….
कार खरेदी करणारा ग्राहक सर्वात आधी कारचे मायलेज पाहत असतो. आम्ही तुम्हाला या ठिकाणी अशा तीन कार संबंधी माहिती देणार आहोत. ज्याची किंमत ३ लाख रुपयांपासून सुरू होते. तसेच यात सर्वात जास्त मायलेज मिळतो. जाणून घ्या या तीन कारच्या परफॉर्मन्स आणि किंमतीसंबंधी.
स्वस्त किंमतीत जास्त मायलेज देणाऱ्या कारच्या शोधात अनेक जण असतात. कार खरेदी करताना कारचे मायलेज किती हे आवर्जून पाहिले जाते. ३ लाख रुपयांपेक्षा कमी किंमत असलेल्या अशा ३ कार आहेत. ज्याचे मायलेज जबरदस्त आहे. जाणून घ्या या कारविषयी.
मारुती सुझुकी ऑल्टो या कारमध्ये 796 सीसी, 3-सिलिंडर, 12-वाल्व, BS-6 इंजिन दिले आहे. याचे इंजिन 6000 आरपीएम वर 48PS ची जास्ताती जास्त पॉवर आणि 3500 आरपीएम वर 69Nm चे पीक टॉर्क जनरेट करते. याचे इंजिन 5-स्पीड मॅन्यूअल ट्रांसमिशन दिले आहे.मारुती सुझुकी ऑल्टो मध्ये 22.05 kmpl चे मायलेज मिळते. तर याच्या सीएनजी वेरिएंटमध्ये 31.59 km/g चे मायलेज मिळते. मारुती सुझुकी ऑल्टो ची भारतीय बाजारात शुरुआती दिल्ली एक्स-शोरूमची किंमत २.९४ लाख रुपये आहे.
दॅटसन रेडी गो मध्ये ०.८ लीट आणि १ लीटर इंजिन निवडण्याचा पर्याय मिळतो. याचे ०.८ लीटर इंजिन ५६७८ आरपीएमवर ५४ पीएस चे पॉवर आणि ४३८६ आरपीएमवर ७२ एनएमचे टॉर्क जनरेट करते. याचे इंजिन ५ स्पीड मॅन्यूअल ट्रान्समिशन दिले आहे. रेडी गो चे १ लीटर इंजिन ५५०० आरपीएमवर ६८ पीएसचे पॉवर आणि ४२५० आरपीएमवर ९१ एनएम चे टॉर्क जनरेट करते. याचे इंजिन ५ स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन दिले आहे. या कारचे मायलेज २२ किलोमीटर प्रति लीटर पर्यंत मिळते. भारतीय बाजारात या कारची किंमत २.८३ लाख रुपये किंमत आहे. तर याच्या टॉप व्हेरियंटची किंमत ४.७७ लाख रुपयांपर्यंत आहे.
रेनॉच्या या कारमध्ये ०.८ लीटर आणि १ लीटरचे इंजिन पर्याय मिळतो. याच्या ०.८ लीटर इंजिन मध्ये ५६०० आरपीएमवर ५४ पीएसचे पॉवर आणि ४२५० आरपीएमवर ७२ एनएमचे टॉर्क जनरेट करते. तर याच्या १ लीटर इंजिन ५५०० आरपीएमवर ६८ पीएसचे पॉवर आणि ४२५० आरपीएमवर ९१ एनएम चे टॉर्क जनरेट करते. Renault Kwid चे १ लीटर इंजिनचे ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मॉडल २२ किलोमीटर प्रति लीटरचे मायलेज देते. तर याच्या १ लीटर इंजिन मॅन्यूअल ट्रान्समिशन मॉडल २१.७४ किलोमीटर प्रति लीटरचे मायलेज देते. तर ०.८ लीटर इंजिन मॅन्यूअल ट्रान्समिशन मॉडल २०.७१ किलोमीटरचे मायलेज देते. रेनॉच्या या कारची सुरुवातीची किंमत २.९९ लाख रुपये आहे. तर याच्या टॉप व्हेरियंटची किंमत ५.१२ लाख रुपये आहे.
याआधी देखील टाटा मोटर्सनं गाड्यांवर जबरदस्त सूट दिल्या होत्या. यामध्ये टाटा हॅरियर, नेक्सॉन SUV, टियागो हॅचबॅक आणि टिगोर सेडानवर उपलब्ध आहेत. त्यच बरोबर मारूती सुझुकीनं १ जानेवारीपासून आपल्या गाड्यांच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला असल्याच जाहीर केल होत. त्यामुळे कार खरेदी करणाऱ्या ग्राहकांकडे फक्त १५ दिवसांचा कालावधी उरला आहे.