केरळ | केरळ विमान दुर्घटनेत महाराष्ट्राच्या सुपुत्राने जीव गमावला आहे. ही दुर्घटना घडली तेव्हाच पायलटचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली. हे पायलट महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत. दीपक वसंत साठे असं अपघातात ठार झालेल्या वैमानिकाचं नाव आहे.
केरळमधल्या कोझिकोड येथील विमानतळावर एअर इंडियाच्या विमानाला ला भीषण अपघात झाला. या अपघातात 16 जणांचा मृत्यू झाला. या विमान अपघातात पायलट दीपक वसंत साठे यांचाही मृत्यू झाला आहे.
कॅप्टन दीपक वसंत साठे हे माजी वायुसेना पायलट होते. त्यांना अनेक महत्त्वाच्या पुरस्कारांनीही गौरवण्यात आले होते. ते एअर फोर्समधले एक कुशल लढाऊ पायलट होते.
‘एनडीए’तील शिक्षणानंतर ११ जून १९८१ साली ते लष्करी सेवेत दाखल झाले. १९९१ ते २००३ या कालावधीत मिलिटरी एव्हिएशनमध्ये ते एक्सपेरीमेंटल टेस्ट पायलट म्हणून काम पाहत होते. विंग कमांडर दिपक साठे ३० जून २००३ मध्ये सेवेतून निवृत्त झाले. त्यानंतर ते एअर इंडियात वैमानिक म्हणून दाखल झाले. अत्यंत हुशार आणि प्रवीण वैमानिक म्हणून त्यांची ख्याती होती.