‘या’ राज्यातील सत्ता जाणार? शेतकरी आंदोलनामुळे भाजपला मोठा झटका

चंदीगड – शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी हरियाणातील काँग्रेस नेत्यांनी बैठक आयोजित केली होती. यावेळी काँग्रेस विधीमंडळ पक्षाने विशेष अधिवेशन बोलावून सरकारविरोधात अविश्वासदर्शक ठराव मांडण्याचा निर्णय घेतला. शेतकऱ्यांच्या रोषामुळे हरियाणातील भाजप सरकार अडचणीत आलं आहे. काँग्रेस पक्षाने हरियाणातील खट्टर सरकारविरोधात विधिमंडळात अविश्वास ठराव मांडणार असल्याची घोषणा केली आहे.

हे वाचा : ८ डिसेंबरला ‘भारत बंद’ ची केली घोषणा! शेतकरी आंदोलन चिघळले

शेतकऱ्यांबाबत मोठी चूक केल्यामुळे हरियाणा सरकार सध्या वाईट अवस्थेत आहे. शेतकऱ्यांना वॉटर कॅननद्वारे पाण्याचा मारा करणं शेतकऱ्यांवर किंवा अश्रुधुराची नळकांडी फोडणं हरियाणा सरकारला थांबवता आलं नसतं का? हरियाणा सरकारची ही कृती निषेधार्ह आहे, असं हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भुपिंदरसिंह हुड्डा यांनी म्हटलंय. दरम्यान, काँग्रेसच्या अविश्वासदर्शक ठराव मांडण्याच्या घोषणेनंतर खट्टर सरकार काय भूमिका घेतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

error: Content is protected !!