महाविकास आघाडीचे जयंत आसगावकर पुणे शिक्षक मतदार संघाच्या पहिल्या पसंतीत पुढे

पुणे : महाविकास आघाडीचे जयंत आसगावकर पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये पुढे असून, माजी आमदार दत्तात्रय सावंत आणि भाजप पुरस्कृत जितेंद्र पवार यांनी देखील चांगली मते घेतली आहेत. तसेच मते बाद होण्याचे प्रमाण देखील अधिक आहे. यामुळे रात्री 9 वाजेपर्यंत शिक्षक मतदार संघाचा कोटा निश्चित होईल. यात पहिल्या पसंतीत आसगावकर यांनी कोटा पूर्ण केल्यास मध्यरात्री पर्यंत शिक्षकचा निकाल जाहीर होईल. परंतु सावंत आणि पवार यांनी घेतलेली मते लक्षात घेता पहिल्या पसंतीमध्ये निवडून येण्याची शक्यता कमी असल्याचे अधिकृत सुत्रांनी सांगितले. असे झाल्यास शिक्षक मतदार संघाचा अंतिम निकाल जाहीर होण्यासाठी देखील शुक्रवारची पहाट उजाडेल. पुणे विभाग शिक्षक व पदवीधर विधान परिषद मतदार संघाची मतमोजणी पुण्यातील बालेवाडी येथील क्रीडा संकुलमध्ये सुरू झाली आहे. यामध्ये शिक्षक मतदार संघातील पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक मतपत्रिका वैध, अवैध व पहिल्या पसंती क्रमांकाची प्रक्रिया पूर्ण होत आली आहे.

हे वाचा : आ. सतिश चव्हाण औरंगाबाद पदवीधरमध्ये आघाडीवर

दरम्यान पदवीधर मध्ये देखील मतपत्रिकांचा चे गठ्ठे बांधण्याचे काम सुरू आहे. हा अंतिम निकाल लागण्यासाठी शुक्रवारी सायंकाळ होईल. आसगावकर, सावंत व जाधव यांनी सिंगल मते अधिक घेतली आहे. पहिल्या पसंती क्रमांक अधिक चालला आहे. शिक्षक मतदार संघातील वैध, अवैध मतपत्रिका शोधण्याचे काम सुरू आहे. याच वेळी पहिल्या पसंतीची मतमोजणी सुरू केली आहे. शिक्षक मतदार संघात बहुतेक मतपत्रिकांमध्ये सिंगल पसंतीचे मतदान अधिक चालले आहेत.

error: Content is protected !!