बीड दि.28: पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीमुळे माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परिक्षेच्या केंद्रामध्ये निवडणूक मतदानामुळे एक दिवसाचा बदल झाला आहे. यासंदर्भात सर्व संबधितांनी नोंद घ्यावी, आणि बदल झाल्याप्रमाणे तात्काळ कार्यवाही करण्यात यावी, असे आवाहन बीड जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ.विक्रम सारुक यांनी केले आहे.
दिनांक 1 डिसेंबर 2020 रोजीच्या मतदानामुळे खालील प्रमाणे परीक्षा केंद्रास बदल केलेला आहे.
हे वाचा : Whatsapp वर ऑफलाईन राहून करा चॅटिंग, कोणालाच दिसणार नाही ऑनलाईन
1) भगवान विद्यालय, बीड ऐवजी भा.वा.सानप प्राथमिक विद्यालय, बीड. 2) चंपावती विद्यालय, बीड ऐवजी चंपावती इंग्लिश स्कुल, बीड 3) बलभीम महाविद्यालय ऐवजी मिल्लिया कन्या शाळा, बीड 4) श्री सिध्देश्वर विद्यालय, माजलगाव ऐवजी सिध्देश्वर महाविद्यालय, माजलगाव 5) न्यू थर्मल ऐवजी स्वामी विवेकानंद महाविद्यालय, परळी 6) जि.प. मा.शाळा शिरूर ऐवजी जि.प. कन्या शाळा, शिरूर (का.) हा बदल केवळ दहावीच्या विज्ञान व तंत्रज्ञान भाग-1 आणि बारावीच्या गणित व संख्याशास्त्र भाग-2 या पेपर पुरताच आहे, याची नोंद घेण्याचे आवाहन शिक्षणाधिकारी (मा.) डॉ.विक्रम सारुक यांनी केले आहे.