राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपूरचे आमदार भारत भालके यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावरती पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार सुरू आहेत . भारत भालके यांना कोरोना झाल्यानंतर आधी पंढरपूर मध्ये त्यांच्यावरती उपचार करण्यात आले. मात्र प्रकृती खालावत गेल्याने दोन आठवड्यांपूर्वी त्यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक मध्ये उपचारांसाठी भरती करण्यात आलं. रूबी हॉल क्लिनिक मध्ये त्यांना निमोनिया झाल्याचं निदान झालं. गेल्या काही दिवसांपासून भारत भालके हे व्हेंटीलेटर सपोर्टवर आहेत.