मी स्वत: शरद पवारांवर पीएचडी करतोय. स्वत:भोवती राजकारण फिरवत ठेवण्याचं कौशल्य खरोखर मोठं आहे. पवारांबद्दल मी अनेकदा गौरवोद्वार काढले. शेती, साखर या गोष्टीत त्यांच्याएवढा अभ्यास कुणाचा नाही. मराठा आरक्षणाबाबतच्या वक्तव्यावरुन मी पवारांवर ते वक्तव्य केलं. मात्र ते व्यक्तिगत त्यांच्याबाबत नव्हतं, ओव्हरऑल नेत्यांबद्दल होतं, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझं व्हिजन या कार्यक्रमात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (BJP Leader Chandrakant Patil) बोलत होते.(I am doing PhD on Sharad Pawar, his skills are great ‘: Chandrakant Patil)
चंद्रकांत पाटील म्हणाले की, सत्ता बदलण्याचं भविष्य आम्ही वर्तवत नाही. प्रखर विरोधी पक्ष म्हणून भूमिका बजावतोय. पुढेही बजावू. अंतर्विरोधामुळं सरकार पडणार हे सर्वे केला तरी लोकं सांगतील. वीज बिल, शाळा उघडणे, परीक्षा यावरुन अंतर्विरोध समोर आला आहे, असं ते म्हणाले.
वीजबिलाप्रकरणात एकाचही कनेक्शन तोडलं तर आम्ही तोडू देणार नाही. बिल तुम्ही करेक्ट करुन देणार नाहीत आणि कनेक्शन देणार. वीजबिलाच्या प्रकरणात तुमची चूक आहे, तुम्ही माफीबद्दल बोललात आणि आता पलटी मारत आहोत. लोकं कनेक्शन कापू देणार नाहीत, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.