धक्कादायक : काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याच्या मुलाचा भाजपमध्ये प्रवेश

पुणे पदवीधर मततदार संघाच्या निवडणुकीनिमित्त भाजपचे प्रदेशाध्यक्ष श्री. पाटील आज कामेरी येथे सी. बी. पाटील यांच्या घरी आले होते. भाजपचे युवा नेते सम्राट महाडिक उपस्थित होते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सी. बी. पाटील यांच्या राजकीय निर्णयाबाबत प्रदेशाध्यक्ष पाटील यांना विचारले असता त्यांनी ‘सी. बी. आप्पा आमचेच आहेत. ते लवकरच पक्षात येतील’ अशी प्रतििक्रया दिली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सी. बी. पाटील आप्पा यांचे सुपुत्र माजी सरपंच जयराज पाटील काल भाजपमध्ये आलेत. सी. बी. आप्पाही लवकरच येतील, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.

तिथे उपस्थित युवा नेते जयराज पाटील यांच्या हाती पुष्पगुच्छ दिला. ‘जयराज यांचा आज भाजपमध्ये प्रवेश झाला’ असे जाहीर केले. जयराज यांनी ही हसत याबाबत ‘आपण सकारात्मक आहे’ असे दाखवून दिले. वाळवा तालुक्‍यातील भाजपच्या गटबाजी संदर्भात श्री. पाटील म्हणाले,‘‘सर्वांना बरोबर घेऊनच आमची वाटचाल असेल. तालुक्‍याची कार्यकारिणी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात निश्‍चित करू. जयराज पाटील यांना भाजप युवा मोर्चाच्या राज्य कार्यकारिणीत संधी देऊ.’’

ग्रामपंचायत सदस्य विनायक पाटील, काँग्रेसच्या जयश्री पाटील, माजी उपसरपंच दिलीप जाधव, धनाजी पाटील, शशिकांत पाटील, महादेव रास्कर, जयदीप पाटील उपस्थित होते. प्रदेशाध्‍यक्ष श्री. पाटील यांच्‍या या छोटेखानी दौऱ्याची मोठी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

error: Content is protected !!