बीडमध्ये पंकजा मुंडेंच्या पहिल्याच सभेला प्रचंड गर्दी

बीड : मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर भाजप नेत्या पंकजा मुंडे या बीडमध्ये सभा घेण्यासाठी दाखल झाल्या आहेत. पंकजा मुंडे आल्यामुळे सभेसाठी मोठी गर्दी झाली. पंकजा मुंडे या उमेदवार शिरिष बोराळकर यांच्या प्रचारार्थ सभा घेण्यासाठी बीडमध्ये दाखल झाल्या आहेत.बीड : मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर भाजप नेत्या पंकजा मुंडे या बीडमध्ये सभा घेण्यासाठी दाखल झाल्या आहेत. पंकजा मुंडे आल्यामुळे सभेसाठी मोठी गर्दी झाली. पंकजा मुंडे या उमेदवार शिरिष बोराळकर यांच्या प्रचारार्थ सभा घेण्यासाठी बीडमध्ये दाखल झाल्या आहेत.

भाजप उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही सभा घेतली होती. यावेळी फडणवीसांनी सत्ताधारी शिवसेनेवर टीका केली होती. “ठाकरे सरकारच्या अजेंड्यावर मराठवाडा-विदर्भ नाहीच. नवीन सरकारने औरंगाबादच्या निधीलाही स्थगिती दिली. समृद्धी महामार्गाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव दिल्यामुळे ते काम सुरु आहे, असा टोला विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला लगावला होता.

“मागच्या वेळी गोपीनाथ मुंडे गेल्यामुळे भाजपचा पराभव झाला, मात्र शिरीष बोराळकर यांनी चांगली मतं घेतली होती. यावेळी मुंडे साहेबांचं स्वप्न पूर्ण करण्याचा आम्ही चंग बांधला आहे. मराठवाडा आणि विदर्भाचं चित्र बदलल्याशिवाय महाराष्ट्राचा विकास होणार नाही” असं फडणवीस म्हणाले होते.

error: Content is protected !!