सतीश भाऊंनी आजवर केलेल्या मदतीची परतफेड करणार- धनंजय मुंडे

परळी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नवीन असताना व विधानपरिषद नियुक्तीच्या पहिल्या वेळी आ. सतीश चव्हाण यांनी मला मोठ्या भावाप्रमाणे मदत केली, पाठबळ दिले; त्याची परतफेड करण्याची ही वेळ असून, परळी मतदारसंघातून मराठवाड्यातील सर्वात मोठी लीड देण्यासाठी जोमाने कामाला लागण्याचे आवाहन धनंजय मुंडे यांनी महाविकास आघाडीच्या पदाधिकारी – कार्यकर्त्यांना केले.

मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणूक २०२० चे महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या परळी मतदारसंघातील प्रचाराचा आज ना. मुंडे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत शहरातील इमादुल उलूम शाळेच्या प्रांगणात नारळ फोडून श्रीगणेशा करण्यात आला. या कार्यक्रमास ना. मुंडे यांच्यासह यावेळी ना. मुंडे यांच्यासह विधानपरिषद सदस्य संजय दौंड, शिवाजी सिरसाट, नगरपरिषद अध्यक्षा सौ. सरोजनीताई हालगे, शिवसेनेचे अभयकुमार ठक्कर, बाळासाहेब देशमुख, अजय मुंडे, पं. स.सभापती उर्मिलाताई गित्ते, बाजीराव भैय्या धर्माधिकारी, सुरेश टाक, राजाभैय्या पांडे, अतुल दुबे, व्यंकटेश शिंदे, सौ. संगीता ताई तुपसागर, राजेश विभूते, अय्युब खान पठाण, वैजनाथ सोळंके, दत्ता आबा पाटील, बबनभैय्या लोमटे, नारायण शिंदे, बाबूभाई नंबरदार, अंजुमन एज्युकेशन सोसायटीचे सचिव बहादुरभाई, महादेव रोडे, गोपाळ आंधळे, रवींद्र परदेशी, अनिल अष्टेकर, शंकर आडेपवार, दिलीप जोशी, शरीफभाई आदींसह, तीनही पक्षांचे प्रमुख मान्यवर नेते, नगरसेवक, पदाधिकारी तसेच परळी शहर व परिसरातील पदवीधर/ शिक्षक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे बोलताना ना. धनंजय मुंडे यांनी पदवीधर मतदारांपर्यंत पोहचून ९०% पेक्षा अधिक मतदान करून घ्यावे, झालेल्या मतदानातून ९०% मतदान हे महाविकास आघाडीच्या उमेदवारालाच मिळेल याची आपल्याला खात्री आहे, असे म्हणतच मतं बाद होणार नाहीत याची दक्षता घेण्याच्याही सूचना दिल्या. महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून पदवीधर, बेरोजगार, विद्यार्थी-शिक्षक आदींच्या समस्या सोडविण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असून, परळी मतदारसंघातील प्रत्येक पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी सतीश भाऊ नव्हे तर धनंजय मुंडे स्वतः उमेदवार आहे, असे समजून कामाला लागावे असेही ना. मुंडे यावेळी बोलताना म्हणाले. 

परळी मतदारसंघातील सर्व पदवीधर मतदारांना संपर्क साधणार – ना. मुंडे 

राष्ट्रवादी काँग्रेस व महाविकास आघाडीने अत्यंत सूक्ष्म स्तरावर निवडणुकीचे नियोजन केले असून, परळी मतदारसंघातील सर्व मतदारांना गृह भेट, दूरध्वनी आणि माध्यमातून स्वतः संपर्क करून मतदानाचे आवाहन करणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी यावेळी आवर्जून सांगितले.

error: Content is protected !!