एक दिवस कराची भारताचा भाग असेल- देवेंद्र फडणवीस

मुंबई | आम्हाला हा विश्वास आहे की एक दिवस कराचीदेखील भारतात असेल, असं वक्तव्य माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

मुंबईतील एका ‘कराची स्वीटस्’ नामक दुकानावरून शिवसेना नेत्यांनी घेतलेल्या भूमिकेवर फडणवीसांनी भाष्य केलं. ते मुंबईत बोलत होते.

कराची स्वीटस्’च्या (karachi sweets )नावाला विरोध करत कराची बेकरीचे नाव बदला किंवा त्यातील कराची हा शब्द काढून टाका, अशी मागणी शिवसेना नेते नितीन नांदगावकर (Nitin nandgavkar) यांनी केली.

दरम्यान, ही पक्षाची अधिकृत भूमिका नसून नांदगावकर यांची वैयक्तिक भूमिका असल्याचं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलंय.

error: Content is protected !!